लेखक चेतन भगत यांचे पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र

0

नवी दिल्ली: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन सुरु झाले आहेत. या मुद्द्यावरून लेखक चेतन भागत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्वीटरद्वारे हल्ला केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून टीकास्त्र सोडत या कायद्याला चेतन भागत यांनी विमानातील प्रवाशी आणि लाईफ जॅकेटचं उदाहरण देऊन सरकारला आरसा दाखविण्याचाच प्रयत्न केला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. यात लेखक चेतन भगत यांनीही गडगडणारी अर्थव्यवस्था. रोजगाराच्या कमी झालेल्या संधी. इंटरनेटवर बंदी. पोलिसांना वाचनालयामध्ये घुसवणे. तरुणांकडे संयम नक्कीच आहे. पण त्यांच्या संयमीची परीक्षा पाहू नका, असे ट्विट करून चेतन भगत यांनी सरकारवर टीका काही दिवसांपूर्वी केली होती.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोदी सरकारला सुनावणाऱ्या लेखक चेतन भगत यांनी पुन्हा एकदा सरकारवर ट्विट हल्ला केला आहे. (सुधारित नागरिकत्व कायदा) आणि हे दोन्ही कायदे मु्स्लिमांवर अन्याय करणारे असल्याची टीका चेतन भगत यांनी केली आहे. विशेष म्हणजे चेतन भगत यांनी आपल्या ट्वीटर वर एक उदाहरण देत टीका केली आहे. मुळात ही समस्या नाही. पण हा कायदा भेदभाव करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.