अहमदाबाद : प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांचे बुधवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. बर्याच दिवसांपासून ते आजारी होते. तारक मेहता का उल्टा चष्मा या सब टिव्हीवरील प्रसिध्द मालिकेमुळे त्यांचे नाव घरोघरी पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
1971 पासून त्यांनी चित्रलेखा साप्ताहिकासाठी लेखन सुरु केले होते. मेहता यांनी 80 पुस्तके लिहिली आहेत. मेहतांनी अनेक भाषांतील विनोदी लेखन गुजरातीमध्ये आणले. तसेच गुजराती नाट्य चळवळीसाठी देखील मोठे कार्य केले आहे. ’दुनिया ने उंधा चष्मा’ हा त्यांचा गुजराती भाषेतील कॉलम प्रसिद्ध होता. या कॉलमवरूनच ’तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका सब टीव्हीने 2008 मध्ये सुरु केली. 2015 मध्ये मेहता यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तारक मेहता यांना श्रध्दांजली अर्पण केली. फेसबुक अकाऊंटवर मोदी यांनी म्हटले आहे की, तारक मेहता यांनी आयुष्यभर व्यंग आणि लेखनीची साथ सोडली नाही. त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले तेव्हा त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली.