जळगाव । समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात लेखक श.मु.चौधरी लिखित “दगड बोलला”…या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रविवारी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यीक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले याप्रसंगी डॉ-चौधरी म्हणालेकी या प्रवासवर्णनात दक्षिण भारतातील महत्वाच्या मंदिरांचे ऐतिहासिक वास्तुंचे व भोगोलिक वैशिष्टांचे दर्शन घडते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक भास्करराव चव्हाण हे होते. मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, ‘या पुस्तकाच्या वाचनामुळे विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळते. हे एक वाचनीय पुस्तक आहे.’ याप्रसंगी श.मु. चौधरी यांनीही पुस्तका विषयी सविस्तर माहिती सांगीतली. हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे.
कवयित्री शिरीष पैंना आदरांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ कवयित्री व सुप्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी अशोक पारधे यांनी केले. यावेळी ज्येष्ठकवी निवृत्तीनाथ कोळी, लेखक डी. बी. महाजन, मिना सैंदाणे, किशोर राजे, पुष्पा साळवे, विशाखा कुलकर्णी, पुष्पलता कोळी, साधना राजे, कमल सोनवणे, प्रा.प्रकाश महाजन, आर.डी. कोळी, युवराज सोनवणे प्रफूल्ल पाटील, अशोक पारधे, श्रीकांत चौधरी, गोविंद पाटील, सतीश पवार, राजेश खोडके, विशाल शर्मा, रा.ना.कापुरे, संतोष मराठे, गोविंद देवरे, यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.