नंदुरबार । सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,नाशिक विभाग,नाशिक यांचे सुचनेनुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षक यांची आढावा बैठक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.वाय.पुरी, नंदुरबार यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत सन 2016-17 मध्ये ठरावानुसार वाटप करण्यात आलेल्या जिल्ह्यातील संस्थांचा आढावा घेण्यांत आला. नंदुरबार जिल्ह्यातील एकुण 770 सहकारी संस्थापैकी 81 सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण पुर्ण झालेले असुन 689 सहकारी संस्थाचे लेखापरिक्षण होणे बाकी आहे. जिल्ह्यातील सन 2015-16 चे दोषदुरुस्तीबाबत आढावा घेण्यांत आला.
लेखापरीक्षणातील अडचणींचे निरसन
सदर संस्थांचे दोषदुरुस्ती अहवाल सादर करण्याबाबत यावेळी संबंधितांना सुचना देण्यांत आल्या.वैधानिक लेखापरीक्षण अहवाल तसेच दोष दुरुस्ती अहवाल कामकाजाचा आढावा उपस्थित असलेले खात्याचे, सनदी व प्रमाणित लेखापरीक्षक यांचेकडुन घेण्यात आला. सभेस उपस्थित असलेल्या लेखापरीक्षकांशी चर्चा करतांना त्यांनी संस्थांचे लेखापरीक्षणात येणार्या अडचणी मांडल्या व त्यांचे निरसन जिल्हा उपनिबंधक यांनी केले. लेखापरिक्षण अहवाल संस्थेस व विशेष लेखापरिक्षक कार्यालयास जुलै अखेरपर्यंत सादर करण्याच्या सुचना सर्व संबधितांना यावेळी दिल्यात.जिल्ह्यातील खात्याचे, सनदी व प्रमाणित लेखापरीक्षक यांची पुढील आढावा बैठक 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे, असे कळवितण्यात आले आहे.