लेखिका जेन ऑस्टेन ब्रिटनच्या चलनी नोटेवर!

0

आपण भारतीय नागरिक गेली सत्तर वर्षे विविध मूल्ये असलेल्या आपल्या सगळ्याच चलनी नोटांवर केवळ महात्मा गांधी या एकमेव व्यक्तींचे चित्र पाहत आलो आहोत. अलीकडच्या काळात एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर प्रथमच दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यांवरही महात्मा गांधी यांचेच चित्र आहे. तेही एक वेळ मान्य केले तरीही नव्याने पाचशेच्या नोटा छापताना तरी निदान अन्य कुणा महान व्यक्तीच्या चित्राचा विचार केला जाईल, असे वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत, दोनशे रुपयांच्या नोटा छापतानादेखील याबाबत वेगळा विचार केला जाईल, अशा भ्रमात न राहणेच बरे! विख्यात ब्रिटिश महिला कादंबरीकार जेन ऑस्टेन हिच्या मरणाला 18 जुलै रोजी ठीक दोनशे वर्षे पूर्ण झाल्याने बँक ऑफ इंग्लंडने जेन ऑस्टेनचे चित्र असलेल्या दहा स्टर्लिंग पौंडाच्या नोटा चलनात आणल्या आहेत! आजवर ब्रिटनमध्ये अनेकदा भटकंती करीत असताना मी, अ‍ॅडम स्मिथ, वॉल्टर स्कॉट, जेम्स व्याट, चार्ल्स डिकन्स, चार्ल्स डार्विन, सर विन्स्टन चर्चिल अशा पुरुषांची चित्रे चलनी नोटांवर जशी पाहिली आहेत तशीच फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि एलिझाबेथ फ्राय या दोन महिलांची चित्रे पाहिली आहेत. इंग्लंडची राणी एलिझाबेथ-द्वितीय ही सत्ताप्रमुख या नात्याने पौंडांच्या नोटांवर एका बाजूला कायम दिसत असली, तरी तिचा अपवाद वगळता, आता जेन ऑस्टेन ही तिसरी ब्रिटिश महिला चलनी नोटेवर काही वर्षांसाठी दिसत राहणार आहे.

जेन ऑस्टेनच्या जन्माची द्वि-शताब्दी जेव्हा 1975 सालच्या डिसेंबरमध्ये ब्रिटनने साजरी केली होती तेव्हा तिचे चित्र असलेली विशेष नाणी चलनात आणली होती. जेन ऑस्टेन ही खासकरून विद्यार्थ्यांत प्रिय असलेली लेखिका होती! ढहश डलहेेश्र – डुेीीं मकशीेळपश असा तिचा लौकिक होता. 16 डिसेंबर 1775 रोजी इंग्लंडमधल्या हम्पशायर परगण्यातल्या स्टिव्हेन्टन रेक्टरी या गावी तिचा जन्म झाला. गरिबीमुळे तिला उच्चशिक्षण घेता आले नाही. अवघ्या 41 वर्षांच्या अल्प आयुष्यात तिने अगदी अखेरच्या सहा वर्षांत सहा कौटुंबिक कादंबर्‍या लिहिल्या ज्यांच्यामुळे तिला दिगंत कीर्ती प्राप्त झाली. 1811 साली डशपीश डशपीळलळश्रळीूं ही तिची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यापुढील प्रत्येक वर्षी अनुक्रमे, झीळवश रपव झीशर्क्षीवळलश चरपीषळशश्रव झरीज्ञ एाार या प्रसिद्ध झाल्या. मात्र, झर्शीीीरीळेप आणि छेीींहरपसशी -ललशू या तिच्या दोन कादंबर्‍या मरणोत्तर प्रसिद्ध झाल्या. याशिवाय, गरलज्ञ -श्रळलश रपव ेींहशी र्र्क्षीींशपळश्रशी या शीर्षकाने तिचा एक कथासंग्रह प्रसिद्ध आहे जो आजही शालेय विद्यार्थी आवडीने वाचत असतात. 1816 पासून ती सतत आजारी होती. त्यामुळे तिने एके दिवशी गावाकडचे घर सोडून दिले आणि ती लंडनमधल्या विन्चेस्टर भागातल्या 8 कॉलेज स्ट्रीटवर राहायला गेली. तिथे जाऊन दोन महिनेदेखील झाले असतील-नसतील तोच तिचे 18 जुलै 1817 या दिवशी निधन झाले. ती हयात असताना फारशी प्रसिद्ध नव्हती. मात्र, मरणोत्तर तिला महान इंग्रज लेखिकांच्या नामावळीत फार वरचे स्थान मिळाले.
प्रवीण कारखानीस- 9604622628