सोयगाव । सोयगाव तालुक्यात मुदतवाढीवसाठी खरीपाचा पिकविमा बँका स्वीकारत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांनी गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर मुजोर बँकांच्या धोरणाविरीद्ध आमरण उपोषण केल्याने सोयगावात खळबळ उडाली होती. दरम्यान तहसील प्रशासनाने बँकांकडून पिकविमा न स्वीकारण्याबाबत खुलासा मागवून उपोषण कर्त्यांना बँकेला आदेशामुळे पीकविमा केवळ ऑनलाईन स्वीकारल्या जात असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण माघारी घेण्यात आले. सोयगावसह जंगलातांडा, आमखेडा, गलवाडा आदि भागातील 20 ते 25 शेतकर्यांनी त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी पीकविमा बँका स्वीकारत नसल्याने उपोषण केले होते. यावेळी विकास काळे, विठ्ठल आगे, रामदास पवार, साईदास राठोड, देविदास पवार, विजय काळे, नारायण पवार, सांडू मांडवे, राणी चव्हाण आदी शेतकर्यांनी सहभाग घेतला.