मुंबई : गुढी पाडव्यानिमित्ताने चारकोप परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला. यावेळी उर्मिलाला पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
उर्मिलाला उत्तर मुंबईतून काँग्रेस पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हा आता मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उर्मिला वेगवेगळे फंडे आजमावता दिसत आहे. चारकोप परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू उर्मिला ठरली आहे. यावेळी उर्मिलाने लेझीमच्या तालावर ठेका धरला. सांस्कृतीक महत्व असलेल्या या गुढीपाडवा स्वागतयात्रेत जनमाणसातून राष्ट्ररक्षा हा विषय मांडण्यात आला. या प्रचारा दरम्यान लहानग्यांची गर्दी जमली तेव्हा तिने रंगिला गर्लने चिमुरड्यांसाठी चक्क गाणे गायले. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.