जुन्नर । महाराष्ट्र राज्य वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची लेण्याद्री गिरिजात्मक गणपतीला सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्याच्या समवेत जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, मोहिते व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. देवस्थानच्या जमिनीमध्ये पायरी मार्गावर दोन्ही बाजूला गणपतीला आवडणार्या वनस्पतीचे गणेशवन निर्माण करून विविध वन औषधी वृक्षांची लागवड करण्यात यावी तसेच दर्शन मार्गावर भाविकांना माकडापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र बिडवई यांनी खारगे यांच्याकडे केली. याप्रसंगी मागणीचा विचार करून लवकरच माकडांचा बंदोबस्त करणेसाठी उपाययोजना करणार असल्याचे खारगे यांनी सांगितले.