लेण्याद्री ट्रस्टच्या अध्यक्षपदी गोविंद मेहेर

0

जुन्नर । अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी गोविंद यशवंत मेहेर, तर उपाध्यक्षपदी कैलास लक्ष्मण लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती माजी अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे व कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई यांनी दिली.

नवीन कार्यकारिणी- अध्यक्ष गोविंद मेहेर, उपाध्यक्ष कैलास लोखंडे, सचिव शंकरराव ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे. या सर्वांचा पुष्पगुच्छ व महावस्त्र देऊन सत्कार केला. लेण्याद्री देवस्थानचे विश्‍वस्त विजय वर्‍हाडी, सुरेश वाणी, प्रभाकर जाधव, बाजीराव कोकणे, प्रभाकर गडदे, नंदकुमार बिडवई, मच्छिंद्र शेटे, जयवंत डोके, काशिनाथ लोखंडे, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे. जुन्नरमधील संस्था, ओझर देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव, खालचा माळीवाडासह ताजणे मळा ग्रामस्थांनी अभिनंदन केले.