जुन्नर । पराग उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मने लेण्याद्री देवस्थान परिसरात लावलेल्या 250 झाडांना वर्षभर पुरेल एवढा सुमारे 1 लाख रुपये किंमतीच्या सेंद्रिय द्रवरूप खतांचा पुरवठा केला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हणे यांनी दिली. देवस्थानने वड, पिंपळ इ. सुमारे 250 झाडे या हंगामात लावली आहेत.
या झाडांची वाढ जोमदार होण्यासाठी हा सामाजिक उपक्रम भाग्यलक्ष्मी डेअरीच्या वतीने हाती घेतला आहे. देवस्थानचे माजी अध्यक्ष जयवंत डोके, विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जितेंद्र बिडवई आणि इतर कर्मचार्यांच्या उपस्थितीत ही खते देवस्थानकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आली. 3 हजार गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंद्रिय खते भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मने जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपलब्ध केल्याचे खतांचे विक्री प्रमुख विशाल भोर यांनी यावेळी सांगितेले. याप्रसंगी पराग मिल्कचे अरविंद देसाई, भाग्यलक्ष्मी डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सहाणे आदी उपस्थित होते.