निगडी (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा लेवा पाटीदार समाज मंडळ व समता भ्रातृ मंडळाच्यावतीने येथील सरदार वल्लभभाई सभागृहात शुक्रवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी समाजाचे मोठया संखेने लोक उपस्थित होते. उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. पाहुण्यांचे भाषण ही झाले. काही समाज बांधवांनी आपले मनोगत मानले. भारत स्वच्छ अभियानार्गंत स्वच्छता केली.