जळगाव। लेवाशक्ति सखी मंचतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून 1 जून ते 10 जून 2017 पर्यंत योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर नि:शुल्क असून 25 भूषण कॉलनी, काशीविश्वेश्वर महादेव मंदिराच्या मागे होणार आहे.
शिबिरात प्रा.चित्रा महाजन या मार्गदर्शन करणार आहेत. शिबिर सकाळी 7 ते 8 या वेळेत होईल. शिबिरासाठी आ.राजुमामा भोळे, महापालिकेच्या नगरसेविका सौ.सीमा भोळे, डॉ.काजल फिरके, पत्रकार तुषार वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिरासाठी विश्वमंगल योग व नॅचरोपॅथी व योग निसर्गोपचार केंद्राचे सहकार्य लाभत आहे. शिबिरातील सहभागींना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी 9403585770, 7747585408 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लेवाशक्ति’ सखीमंचतर्फे किशोरी राणे, प्रा.चित्रा महाजन, लिना पाटील, सुवर्णा चौधरी आदींनी केले आहे.