‘तांदूळ व मूग यापासून तेलविरहीत पदार्थ बनवणे’ बनविण्याची थीम
पिंपरी-चिंचवड : ‘लेवाशक्तिसखी मंच’ आयोजित पाककलाकृती स्पर्धांमध्ये मोरे वस्तीमधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागींनी परिश्रमपूर्वक खूप सजावट करुन तेलविरहीत पदार्थ बनवून आणले होते. ‘तांदूळ व मूग यापासून पदार्थ बनवणे’ अशी थीम होती. त्यानुसार चकली, ढोकळा, आप्पे, खिचडी, मसाला डोसा, मुग डाळीची कचोरी, तांदळाची खीर, मुगाचे आप्पे, मसाले भात, इडली असे अनेक विविध पदार्थ बनवले होते
महिलांनी एकत्र यावे : कांचन ढाके
परीक्षक म्हणून कांचन ढाके व जोत्स्ना चौधरी यांनी काम पाहिले. ढाके म्हणाल्या, ‘या पध्दतीने आपण सर्व महिला एकत्रित आलो तर एकमेकांकडून शिकता येईल’. चौधरी म्हणाल्या, ‘आपल्याला अजून पौष्टीक पध्दतीने कसा पदार्थ बनवता येईल ते आपण विचार करायला हवा, यामधून आपली क्रिएटिव्हीटी बाहेर काढता येईल. आपल्या परिवारालाही खूप पौष्टिक अन्न आपल्याला देता येईल’. पाककलेचे आयोजन रेखा भोळे, विभावरी इंगळे, किरण पाचपांडे यांनी केले होते.
सखी मंचतर्फे रोजगाराचा प्रयत्न
स्पर्धेमध्ये रुपाली चोपडे, भारती वराडे, सुलभा नारखेडे, प्रीती बोरोले, सुषमा बढे, विजया पाटील, अनिता वराडे, शीतल खर्च, अनुराधा नारखेडे, शुभांगी कोल्हे, माया पाटील, ममता पाटील, श्रध्दा कोलते यांनी भाग घेतला. अशीच स्पर्धा विनामूल्य विविध ठिकाणी भरविण्यात येणार आहे. तसेच चांगले पदार्थ बनविणार्या महिलांना ‘लेवाशक्ति सखी मंच’तर्फे रोजगार देण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन मंचच्या वतीने रेखा भोळे यांनी दिले.