‘लेवाशक्ती सखी मंच’च्या पाककला स्पर्धेला निगडी प्राधिकरणात प्रतिसाद

0

पिंपरी-चिंचवड : ‘लेवाशक्ती सखी मंच’ आयोजित पाककला स्पर्धा निगडी प्राधिकरण परिसरामध्ये विनाशुल्क घेण्यात आली. यामध्ये मूग किंवा तांदळाचा वापर करत अनेक गोड व तिखट पदार्थ स्पर्धकांनी तयार केले. यात मूग कबाब, तांदळाची सांबर वडी, व्हेज बिर्याणी, तांदळाचा डोसा, भाताचे कटलेट, मूग व भाताचे थालीपीठ, मेथी चटणी, मूगाचे घावन, सुरळीची वडी, मोडाच्या मुगाचे पौष्टीक लाडू, तिरंगी उकडीचे मोदक, मूग डाळीचे लाडू, उकडीचे मोदक, तांदूळ व मूगडाळीचे गोड आप्पे, तांदळाचा गोड ढोकळा, इडिअप्पम, मूग डाळीचा पुरणाचा मोदक याचा समावेश होता. संत तुकाराम उद्यानात स्पर्धा झाली. गणेश चतुर्थी असल्यामुळे तांदळापासून गणपती डेकोरेशन बनवून त्यांना उकडीचे मोदक अर्पण केले. अनेक पदार्थ कला-कुसरीने मांडले होते.

स्पर्धेत यांनी घेतला भाग
माधुरी पाटील, भारती पाटील, आशालता महाजन, छाया पाटील, हेमलता पाटील, शुभांगी बेंडाळे, रेखा चौधरी, उषा भोळे, पुष्पा भोळे, कल्पना पाटील, शिल्पा पाटील, माधुरी सरवदे, दिपाली टोके, हेमलता पाटील, अमृता बेंडाळे, शालिनी पाटील, दिपाली महाजन, रेखा चौधरी, नैना पाटील, नम्रता पाटील या महिलांनी भाग घेतला होता. प्रा. तुलसी नारायण फिरके व सुनिता इंगळे यांनी परीक्षण केले.

यांनी केले आयोजन
रेखा भोळे, किरण पाचपांडे, गौरी सरोदे, रजनी बोंडे, विभावरी इंगळे, चारुलता चौधरी, शितल नारखेडे यांनी केले होते. पण प्राधिकरण व निगडी या भागातून स्पर्धेमध्ये ÷उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी महिलांना प्रेरणा देण्याचे महत्वाचे काम बहिणाबाई मंडळाच्या अध्यक्षा विजया जंगले, जोत्स्ना चौधरी, शुभांगी व सुनिता या सर्व भगिनींनी केले.

महिलांमधील स्त्री-शक्तीचा पाकगुणांचा जागर करून तिच्यामध्ये पाककलेविषयी आवड निर्माण करणे हा स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. एखाद्या मूग किंवा तांदळाच्या पदार्थापासून अनेक पदार्थ तयार करून त्याला सजावट करून सर्वांसमोर आपला पदार्थ कसा चांगला वाटेल, यासाठी खूप मेहनत सर्व स्पर्धकांनी घेतली. त्यातूनच नवनिर्मिती त्यांच्या मनाची या पदार्थाची तयार झाली होती. लेवाशक्ती सखी मंचाने महिलांसाठी निर्माण केलेल्या या व्यासपीठाचा उद्देश यशस्वी झाला आहे.
-रेखा भोळे, आयोजक, लेवाशक्ति सखी मंच