लेवाशक्ती सखी मंचाच्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मंच उपलब्ध व्हावा म्हणून स्पर्धेचे आयोजन
चिंचवडेनगरमधील महिलांचा सहभाग

चिंचवड : पाककला स्पर्धेमुळे खांदेशी खाद्य संस्कृती पुढील पिढीस मिळावी, आपल्या खाद्य संस्कृतीचे जतन व्हावे आणि संवर्धन व्हावे. तसेच शहरात आपल्या समाजाच्या महिलांना, सुगरणींना मंच उपलब्ध व्हावा, यासाठी लेवाशक्ती सखी मंच पाककला स्पर्धांचे आयोजन करीत असते. या आयोजनामध्ये महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. चिंचवडेनगर, विठाई कॉलनी याठिकाणी या पाककलेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी काढून सुंदर सजावट करून महिलांनी तयारी केली होती. त्यातून त्यांचा उत्साह दिसून येत होता.

म्हणून स्पर्धेचे आयोजन
यामध्ये इयत्ता 10 वी मध्ये असलेली यशश्री चौधरी हिनेही स्वतःच्या हाताने पदार्थ बनविला व या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. ती म्हणाली की, मी दहावीला आहे. अभ्यासाला वेळ कमी पडेल असा विचार करून मी घरी राहिले नाही. रात्री दोन तास जागून अभ्यास करू शकते. पण मला पदार्थ बनवायला खूप आवडतात. लेवाशक्ती सखी मंचाचा हाच उद्देश आहे की, आपल्या पुढच्या पिढीलाही संस्कार देता येईल. गृहिणी म्हणून सर्वात आधी एका स्त्री ही जबाबदारी असते उत्तम, पौष्टीक असे अन्न बनविणे. ही संस्कृती जोपासता येईल व फक्त मूग आणि तांदूळापासून असे कितीतरी वेगवेगळे पदार्थ बनविता येतात. हे सर्वांसमोर मांडता येईल. म्हणूनच या पाककलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, असे रेखा गोळे म्हणाल्या.

या पाककला स्पर्धेमध्ये भावना बोंडे, प्रेरणा बोरोले, माधुरी भंगाळे, सिंधू भारंबे, विद्या गाजरे, निता महाजन, यशस्वी बोरोले, सायली चौधरी, कविता चौधरी आदी महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महिलांनी तिखट व गोड पदार्थ बनविलेले होते. यामध्ये प्रामुख्याने मूग डाळीचे वडे, डाळीचे दहीवडे, तांदूळ-मूग डाळीचे आप्पे, मूगडाळ कचोरी, मूग डाळीची ऐळणी, मूग पापडी चाट, खांडवी, पौष्टीक मूग टिक्की, बीट पुलाव, हरेभरे वडे, मूगडाळ डोसा असे अनेक चविष्ट व रुचकर पदार्थ बनविले होते.

मूग डाळीचे पौष्टीक पदार्थ कळले
या पाककलेच्या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती व आयोजन कर्ते रेखा भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, चारूलता चौधरी, शितल नारखेडे, विजया जंगले, किरण पाचपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चिंचवडे नगर विभागामध्ये अजंली सुनील पाटील या परिक्षक म्हणून उपस्थित होत्या. महिलांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमाबद्दल काय बोलावे तेच कळत नाही. पण हा कार्यक्रम खूप छान होता. महिलांनी बनविलेले पदार्थ खूपनच रुचकर आहेत. सर्वच पदार्थ, त्यांची सजावट अप्रतिम होते. या स्पर्धेमुळे मूग डाळीपासून पौष्टीक पदार्थ कसे तयार करावे हे समजले. सर्वांना आवडतील असे पदार्थ बनविणे कष्टाचे काम असते. दुसर्‍या परिक्षक पल्लवी इंगळे म्हणाल्या की, कार्यक्रम खूपच छान होता. अगदी लहान मुलांपासून ते आजीपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पदार्थ अतियश पौष्टीक व चविष्ट होते. खूप सुंदर संकल्पना लेवाशक्ती सखी मंचाने अंमलात आणली आहे. त्याबद्दल मंचाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करते.