जळगाव । लेवा पाटीदार समाजातील उद्योजकांसाठी लेवा चेंबर ऑफ कॉमर्स् अँड अॅग्रीकल्चरच्या खान्देश रिजन अर्थात एलसीसीआयएचा शुभारंभ रविवार 15 जानेवारी रोजी करण्यात आला. याप्रसंगी पुणे चॅप्टरचे संस्थापक रविंद्र चौधरी, नरेंद्र बर्हाटे, वासुदेव पाटील, पुरूषोत्तम पिंपळे, सतिश फिरके व डॉ. पवन भोळे उपस्थित होते. तसेच खान्देश चाप्टरचे किशोर ढाके, नितीन इंगळे, अनिल बोरोले, डॉ. अनिल पाटील, अॅड. पुष्कर नेहेते, चंदन अत्तरदे, बिपीन पाटील, ए. आर. चौधरी व प्रविण खडके उपस्थित होते.
समाजातील प्रत्येक व्यवसायिकांकडे जाण्याचा निर्धार
या फोरमच्या खान्देश रिजनसाठी 2 जानेवारीपासून नावनोंदणीस सुरूवात होवून 14 जानेवारीपर्यंत 350 उद्योजकांनी आपली नोंदणी केली आहे. या फोरमचा मुख्य उद्देश हा देशातील व परदेशातील लेवा पाटीदार बांधवांना एकत्र आणण्याचा आहे. यावेळी डॉ. रविंद्र चौधरी यांनी एलसीसीआयएच्या स्थापनेबाबत मार्गदर्शन केले. लेवा पाटीदार समाज प्रत्येक बिझेनेसमध्ये असून फोरमच्या मदतीने यासर्वांपर्यंत पोहचण्याचा मानस चौधरी यांनी बोलून दाखविला. लेवा पाटीदार समाजातील उद्योजकांसाठी फोरमच्या माध्यमातून वर्कशॉप घेण्यात येणार आहे.
काबाड कष्ट करणारी जमात
दी पिपल्स् बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी लेवा पाटीदार समाज हा बुध्दीजीवी समाज असून काबाडकष्ट व जिद्द ही समाजाची वैशिष्ट असल्याचे सांगितले. लेवा पाटीदार शेती करणार्यां युवकांच्या लग्नाचा प्रश्न बिकट झाला असल्याचे सांगितले. समाजातील युवकांना सहकार्य करण्यासाठी फोरमची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील युवकांवर विश्वास ठेवा, पुर्वग्रहीत विचार न ठेवतांना युवकांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच फोरम आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास नव उद्योजकांना तारून नेवू शकतो असे स्पष्ट केले.
कौशल्य विकासास मदत
सीड इन्फोटेकचे नरेंद्र बर्हाटे यांनी लेवा पाटीदार समाज अनेक वर्षांपासून शेती करत आहे. लेवा पाटीदार ही प्रचंड कष्ट करणारी जमात असून जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेवलेली जमात असल्याचे गौरद्गार काढले. उत्तम कौशल्य अंगी असेल तर भारतात महासत्ता बनण्याची क्षमता असल्याचे बर्हाटे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी बिझेनेस मॉड्युलचे उद्योग उभारण्यात तसेच उद्योग कसा यशस्वी करता येतो याचे प्रझेंटेशनद्वारे स्पष्टीकरण केले. यावेळी ग्लोबल नॉलेज मिशनचे सतीश फिरके यांनी शेती उद्योग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर किशोर ढाके यांनी पहिल्या पिढीतील उद्योजक असल्याने अडचणी घेवून कोणाकडे जावे हे समजत नव्हेत परंतु फोरमच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणी सुटण्यस मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. ज्योती महाजन व आर्कीटेक सुचिता चौधरी यांनी
तर आभार चंदन आत्तरदे यांनी मानले.