लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे गुणगौरव

0

भुसावळ । भाजयुमो सदस्य पृथ्वीराज रवी पाटील, यांना राष्ट्रीय स्तरावर किक बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक मिळाले व त्याची राष्ट्रीयस्तरावर रेफ्री पदावर निवड झाली. त्याबद्दल लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित गुणगौरव समारंभात पृथ्वीराजचा आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब प्रमुख रमेश पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख वसंत पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे आदी उपस्थित होते.