समता भ्रातृ मंडळातर्फे आयोजन, समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : समता भ्रातृ मंडळ मंडळ (लेवा पाटीदार) पिंपरी-चिंचवड परिसरतर्फे आंतरराष्ट्रीय विवाहेच्छू वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शनिवार (दि. 4 नोव्हेंबर) रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात संपन्न होणार आहे. सर्व समाजबांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बर्हाटे, उपाध्यक्ष रघुनाथ फेगडे, सचिव चुडामण नारखेडे, खजिनदार सीताराम राणे आदींनी केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती लाभणार
या मेळाव्याला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे, जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, मा.अध्यक्ष म.स.सा.का. फैजपूर शरद महाजन, भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, नगरसेवक नामदेव ढाके यांच्यासह विविध क्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
15 वर्षांपासून यशस्वी आयोजन
समता भ्रातृ मंडळ (लेवा पाटीदार) हे गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने समाजातील विवाहेच्छू वधू-वरांसाठी परिचय मेळावा आयोजित करत आहे. यंदाच्या मेळाव्याची खास वैशिष्ट्ये म्हणजे, या मेळाव्यासाठी 1 दिवस आधी बाहेरच्या देशातून, राज्यातून व गावातून आलेल्या विवाहेच्छू वधू-वर व पालकांसाठी राहण्याची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. त्यासाठी दीपक उर्फ ज्ञानेश्वर पाटील (आळंदी) यांच्याशी 9822540670 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मेळाव्याचे स्थळ असलेले भोसरी हे शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असून, तेथे येण्यासाठी सार्वजनिक बससेवा उपलब्ध आहे.
डिजिटल पद्धतीने वधू-वर मेळावा
भारतात सर्वप्रथम डिजिटल पद्धतीने लेवा वधू-वर मेळावा घेणारे समता भ्रातृ मंडळाने यंदाही भव्य एलईडी 20 स्क्रीन मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. RF ID : Vadhu-Var-INtroduction System/SOFTCOPY/Android App अशा उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून लेवा समाजाला एक प्रकारची तत्पर सेवा देण्याचे काम समता भ्रातृ मंडळ करत आहे. ‘अहो पुणे तेथे काय उणे, तेथे लग्न सुद्धा जुडे’. मागील वर्षी मेळाव्यात 15 लग्न ठरली होती. या वर्षी सुद्धा ज्यांचे मेळाव्याच्या दिवशी लग्न ठरेल; त्या वधू-वरांना पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. मंडळाकडे विवाहोच्छू वधू-वरांची 1500 नोंदीसह बिनचूक सूची आहे, असेही अध्यक्ष रवींद्र बर्हाटे यांनी कळवले आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केल्याचे उघड