लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर महामेळाव्यास सुरूवात

0

जळगाव । शहरातील जी.एस.मैदानावर रविवारी लेवा नवयुवक संघातर्फे विवाहेच्छुक वधू-वर महामेळाव्यास सुरूवात झाली. महामेळाव्याचे उद्घाटन माजी महसुलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर, आमदार हरीभाऊ जावळे, पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, भोरगाव लेवापंचायतचे कुटुंबनायक रमेश पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश मामा भोळे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दिली. देश विदेशातील लेवा पाटीदार समाज बांधवांचीही या मेळाव्यास उपस्थिती होती.

दरम्यान महामेळाव्यात विवाहेच्छु वधु-वरांची नावे नोंदणी असलेली पुस्तिक ही मेळाव्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असून या पुस्तिकेत 3200 पेक्षा अधिक विवाहेच्छु वरांची संख्या तसेच 2200 पेक्षा जास्त विवाहेच्छु वधुंची संख्या असून ही पुस्तिका घेण्यासाठी लेवा समाजातील वधू, वर यांच्या पालकांची एकच गर्दी जमली होती. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, आय.एस.आय., आय.पी.एस. आणि उच्चशिक्षित, व्यापारी, उद्योजक व वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ अशा स्वरूपातचे विवाहेच्छू वधू-वर महामेळाव्यात आपापला परीचय दिला. विशेष म्हणजे श्रीमंत, गरीब, अशिक्षित, अल्पशिक्षित आणि उच्च शिक्षित या सर्वांनी कोणताही भेदभाव न करता एकत्र येवून एकाच ठिकाणी परीचय दिला. या महामेळाव्याचे वैशिष्य म्हणजे सर्व समाज बांधवांसाठी नाष्टा, चहा व मिनरल वॉटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.