लेवा पाटीदार समाजातील गुणवंतांचा सत्कार

0

भुसावळ। अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील लेवा पाटीदार समाजातील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

इयत्ता चौथी ते सातवी स्कॉलरशिप, एमटीएस, एनटीएस परिक्षा गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच दहावीत 80 टक्क्यांच्यावर, बारावीत 75 टक्क्यांच्यावर यासह पदवी, पदव्युत्तर परिक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिंचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी भुसावळ येथे पुरुषोत्तम मेडिकल, कल्पना रसवंती, यावल येथे उमेश फेगडे, श्रीकृष्ण ट्रेडर्स, फैजपूर येथे श्रीराम अ‍ॅग्रो, सावदा येथे हेरंब कलेक्शन, मुक्ताईनगर येथे दत्त बुक डेपो यांच्याशी संपर्क साधावा.