भुसावळ- अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शहरातील संतोषी माता हॉलमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता होत आहे. अध्यक्षस्थानी माजी महसूलमंंत्री एकनाथराव खडसे असतील. प्रमुख अतिथी म्हणून भोरगाव लेवा पंचायतीचे अध्यक्ष रमेश विठू पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार राजुमामा भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, वासुदेव इंगळे, शरद महाजन, बाळू पाटील, दिनेश भंगाळे, दिनेश पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.