लेवा पाटील समाजातील महिलांसाठी लेवाशक्ती सखी मंच हक्काचे व्यासपीठ

0

कुटुंब नायक रमेश पाटील ; समाजातील महिलांनी लेवाशक्ती सखी मंच चे विनाशुल्क अर्ज भरावे

फैजपूर- लेवा समाजातील महिलांनी आज एकत्र येण्याची वेळ आहे. आज समाजातील महिला बाहेर वावरतांना मनात भीती मनात न बाळगू नये म्हणून लेवाशक्ती सखी मंच महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्याचे आज फैजपूर शहरातून उद्घाटन करण्यात आले असल्याचे भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी 11 वाजता गावातील श्रीराम मंदिर येथे लेवाशक्ती मंचतर्फे गावातील लेवा समाजातील महिलांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पुणे येथील लेवाशक्ती मंच महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखा भोळे, पुणे येथील विभावरी इंगळे, गौरी सरोदे, माजी नगराध्यक्ष आशालता चौधरी, यतीन ढाके, भारत महाजन व मनोज ढाके उपास्थित होते.

लेवा समाजातील महिलांनी पुढे यावे -बी.के.चौधरी
बी.के.चौधरी यांनी सांगितले की, महिला या बैलगाडीचे एक तर दुसरे चाक पुरूष आहे. त्यामुळे महिलांनी पुरुषांच्या बरोबरीला काम काम केले पाहिजे. लेवा समाजातील महिला कुठल्याही क्षेत्रात मागे न राहता सर्वांच्या पुढे राहिल्या पाहिजे म्हणून लेवाशक्ती सखी मंच महिलांसाठी उपयेागी असल्याचे ते म्हणाले.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी लेवाशक्ती सखी मंच -रेखा भोळे
लेवाशक्ती सखी मंचला सुरुवात केले त्यावेळी अल्प प्रतिसाद मिळाला पुणे येथे प्रत्येकाच्या घरो घरी जाऊन लेवाशक्ती सखी मंच अर्ज भरून घेत होती. मात्र काही अडचणी मुळे महिला यात भाग घेत नव्हते. लेवाशक्ती सखी मंच हा महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी स्थापन झाला असल्याचे लेवाशक्ती सखी मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष रेखा भोळे यांनी सांगितले. आज या लेवाशक्ती सखी मंचला लेवा समाजातील महिलांनी भर भरून प्रतिसाद दिला आहे. यात पुणे, बुलढाणा, मलकापूर, जळगाव या जिल्ह्यात लेवाशक्ती सखी मंच विखुरला गेला आहे. लेवा समाजातील महिलांनी एकत्रीकरण करणे आज काळाची गरज झाली आहे. महिलांना आपल्याच अस्तित्वाची जाणीव आपल्याला नाही, असे महिलांना वाटते त्यामुळे आम्ही लेवाशक्ती सखी मंचतर्फे लेवा समाजातील महिलांना यात पुढे आणणार आहोत. यासाठी लेवा भगिनी यांनी लेवाशक्ती सखी मंचचे अर्ज भरून द्यावे, असे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
सावदा येथील नगराध्यक्ष अनिता येवले, नगरसेविका शकुंतला भारंबे, लिना चौधरी, रंजना भारंबे, जयश्री अतुल नेहते, जयश्री चौधरी,यामिनी पाटील, मोहिनी पाटील, सूत्रसंचालन संजय सराफ यांनी केले तर आभार भूषण चौधरी यांनी मानले.

लेवाशक्ती सखी मंच अर्जासाठी यांच्या कडे करा संपर्क
लेवाशक्ती सखी मंच अर्जासाठ निता गाजरे, जळगाव (9021180740), चित्रा महाजन, जळगाव (9423185981), संगीता चौधरी, फैजपूर (7058044032), जयश्री चौधरी, फैजपूर (7875506588), यामिनी पाटील, यावल (9503196137) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.