जळगाव । अखिल भारतीय लेवा विकास महासंघ सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, युवा विकास फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाजातील इयत्ता 10, 12वीसह पदवी व पदव्युत्तर परीक्षांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘यशवंत गुणगौरव सोहळा’ सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे झाला.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, कुटुंबनायक रमेश पाटील,कुलगुरु डॉ.पी.पी. पाटील, डॉ.एन.एस.चौधरी,जिल्हा चेअरमन रोहिणी खेवलकर, आ. सुरेश भोळे, आय.ए.एस स्वप्नील पाटील, डी.वाय.एस.पी.आर.सी.पाटील, डॉ. उल्हास पाटील, सिने अभिनेत्री प्रियंका टोके, डॉ. ए.जी. भंगाळे, सभापती पोपट भोळे, अॅड. संजय राणे, वामनदादा खडके, माजी महापौर विष्णू भंगाळे, मधुकर कारखान्याचे शरद महाजन, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, सरकारी वकिल केतन ढाके, दैनिक जनशक्ति, लेवाशक्ती पुणेचे संपादक कुंदन ढाके, दै. साईमतचे प्रमोद बर्हाटे, दुध फेडरेशनचे संचालक सुभाष टोके, प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, सुनिल महाजन, महेश पाटील, महेश पाटील, फैजपूरचे नगराध्यक्ष बी.के. चौधरी, प्रदेश अध्यक्ष स्नेहल फेगडे, उज्ज्वला बेंडाळे, शालिनी काळे, डॉ. प्रमोद इंगळे, सागर भंगाळे आदींची उपस्थिती होती.
करीयरसोबत संस्कृती टिकवा..
अॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी सत्कारार्थीचे अभिनंदन करत आधुनिक शिक्षण क्षेत्रात खुप वाव आहे. जिद्द हवी उद्दीष्ट हवे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. डॉ.पी.पी.पाटील विद्यार्थ्यांनी भविष्यात करियर बरोबरच संस्कृतीही टिकवावी, असे आवाहन केले. उद्घाटक किशोर राजे निंबाळकर विद्यार्थ्यांनी यशस्वीतेसाठी अभ्यासाबरोबर प्राणायाम, योगा, ध्यान, चिंतन कुरन सुदृढ शरीर ठेवावे, जीवनात ज्या क्षेत्रात करीयर करायचे असेल त्यात प्रमाणिक प्रयत्न करा. पालकांनी सुध्दा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार कॅरीयर करु द्यावे त्यांना कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करु नये, असे आवाहन केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी जगन्नाथ किंरगे, ललित चौधरी, राजेश वारके, ललित महाजन, अॅड. महेश ढाके, मनोज वाणी, रवी रडे, महेंद्र पाटील, प्रा. सुरेश अत्तरदे, प्रा. निलेश चौधरी, प्रा. योगेश महाजन, धनंजय तळेले, जयेश ढाके, जगदिश जावळे, भूषण झोपे, यतीन रोटे, बिनीप झोपे, विवेक महाजन, हेमंत पाटील, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, प्रथमेश पाटील, विलास नेहते, डिगू भंगाळे, लुकेश महाजन, विकी काळे, उमेश पाटील, दिपक वाडे, देवेंद्र सुर्यवंशी, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.