जळगाव (प्रतिनिधी) – लेवा समाजात एकजूटीची भावना ठेवणे गरजेचे आहे. लेवा समाजाचा माणूस आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगूरू झाला ही भुषावह बाब असून आज समाज बांधव सातासमुद्र पार आले कार्याचा झेंडा फडकवला असून खान्देशासह विदर्भातही लेवा समाज एकत्रित असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. नागपूर भ्रातृ मंडळाच्या सुवर्णमहोत्सव समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आज लेवा समाजाने आपले नाव सातसमुद्राच्या पलिकडे नेवून विविध कार्यक्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. ज्या ठिकाणी समाजबांधव काम करत असेल, त्या ठिकाणी सर्वांनी एकजुटीने भावना निर्माण करावी, असे बोलतांना माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. यावेळी नागपूर भातृ मंडळातर्फे व्हि.एन.नारखेडे यांचा समाजभूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, उमविचे कुलगुरु पी.पी.पाटील, आ. राजूमामा भोळे, आ.संजय सावकारे, आ. हरीभाऊ जावळे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, नागपूर भातृ मंडळाचे अध्यक्ष द.न.पाटील, उपाध्यक्ष शंकरराव देशमुख, कार्यवाहक अॅड.वि.नि.पाटील यांची उपस्थिती होती.