लेवा समाज वधू-वर सुचीबाबत आवाहन

भुसावळ : लेवा पाटीदार समाजातील वधू-वर सूचित नाव नोंदणी सुरू असून नाव नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले आहे. जगभरातील लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांची वधु-वर सुची नाव नोंदणी 2022-2023 लेवा नवयुवक संघ जळगावद्वारा जगभरातील 250 सेंटरद्वारा संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी येथे साधा संपर्क
या सुचीत नाव नोंदणीसाठी लागणारे फार्म भुसावळ येथील आपले परीवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळा रोड येथे सकाळी 7 ते 11 या वेळात उपलब्ध आहेत. सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांनी आपली नावे नोंदवावी, असे आवाहन पराग पाटील, प्रमोद सरोदे, श्रीकांत पाटील व संचालक मंडळाने केले आहे.