जळगाव। 8 मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या महिला दिनानिमित्त ‘लेवा सम्राज्ञी’ या लेवा समाज महिला संघटनेच्या वतीने लेवा समाजातील विधवा, दिव्यांग उद्योजिक महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी 19 रोजी शहरातील लेवा भवन येथे करण्यात आले. प्रतिकुल परिस्थितीत संसाराची घडी निट बसवुन समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कर्तृत्ववान महिलांचा करण्यात आला गौरव
यात लक्ष्मी वानखेडे, सविता चौधरी, प्रतिभा नेमाडे, गोदावरी पाटील, कुमुद, नारखेडे, छाया भोळे, प्रतिभा पाटील, सुलोचना पाटील, प्रतिभा तळेले, रेखा चौधरी, रोहिणी चौधरी, गीताई महिला मंडळ आदींचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींचा तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.वर्षा पाटील, डॉ.शिल्पा बेंडाळे, सिंधुताई कोल्हे, डॉ.ज्योती महाजन, डॉ.मंगला जंगले आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
सत्कार समारंभाचे प्रास्ताविक हर्षाली चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रणिता झोपे यांनी तर आभार ज्योती महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा सम्राज्ञीच्या संचालक मंडळाच्या रिता येवले, पूजा भंगाळे, मनिषा महाजन, पूनम काळे, डॉ.भावना चौधरी, निलीमा चौधरी, लिना चौधरी, किर्ती पाटील, प्रांजल पाटील, रचना कोल्हे यांनी सहकार्य केली.