लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या आयटी कंपनीच्या उपाध्यक्षाची आत्महत्या

0

नवी दिल्ली- जेनपॅक्ट या आयटी कंपनीतील सहाय्यक उपाध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. स्वरूप राज असे त्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वरूप राज यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कंपनीतून निलंबित करण्यात आले होते.

स्वरूप राज यांनी पत्नी कृतीच्या नावे ही सुसाइड नोट लिहिली आहे. ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर खोटेनाटे लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. ऑफिसमधल्याच एका मुलीने माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. तपासात जरी मी निर्दोष आढळलो तरी आरोप लागल्यामुळे आजूबाजूचे लोक माझ्याकडे संशयित नजरेनेच पाहणार आहेत. असे आरोप डोक्यावर असताना मी पुन्हा कंपनीत कसा जाणार?, असे लिहिले आहे.