लॉकडाउन: आज पासून काय सुरू, काय बंद?

0

मुंबई – देशव्यापी लॉकडाउन सुरूच असून मात्र, आज पासून केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन नसलेल्या भागांसाठी सशर्थ सूट देऊ केली आहे. मात्र, करोना हॉटस्पॉट असणार्‍या भागांमध्ये कडक निर्बंध लागूच असणार आहेत. याच धर्तीवर महाराष्ष्ट्र सरकारने आज २० एप्रिलपासून ग्रीन व ऑरेेंज भाग असलेल्या परिसरात काही अटी-शर्थींवर अंशता सेवा, उद्योग, व्यापार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

आज २० एप्रिलपासून खालील सेवा सुरू राहणार झाल्या आहेत.

  • ग्रामीण क्षेत्रातील उद्योगधंदे
  • किराणा आणि रेशनची दुकाने.
  • वर्तमानपत्रे, वृत्त वाहिन्या, डीटीएच आणि केबल सेवा
  • इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोटर मेकॅनिक, कारपेंटर, आयटी दुरुस्ती, कुरिअर सेवा.
  • फळभाज्या, फळांची दुकाने, साफसफाईचे सामान विकणारी दुकाने.
  • दूध आणि दुधाशी संबंधित अन्य पदार्थांची दुकाने.
  • चिकन, मटण, मासे आणि अंडी विकणारी दुकाने.
  • ई कॉमर्स कंपन्यांकडून अत्यावश्यक वस्तूंची सेवा.
  • काही व्यावसायिक आणि खासगी आस्थापने
  • राज्यांतर्गत प्रवास करत मजुरांना काम करण्याची मुभा
  • जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा.
  • ५० टक्क्यांच्या कर्माचारी संख्येने आयटी आणि आयटीशी संबंधित सेवा
  • मनरेगाची कामे
  • सार्वजनिक सेवा-सुविधा
  • मालाचे लोडिंग-अनलोडिंग ( राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय)
  • निवडक उद्योग (सरकारी आणि खासगी)
  • परवानगी देण्यात आलेल्या कामगारांना कामाच्या स्थळी प्रवास करणे
  • केंद्र, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शासकीय कार्यालये

या सेवा राहणार बंद

  • प्रवासी रेल्वे वाहतूक
  • सार्वजनिक बस सेवा
  • मेट्रो रेल्वे सेवा
  • विमान वाहतूक
  • ऑटो रिक्षा, कॅब सेवा
  • आंतरजिल्हा आणि आंतरराज्य व्यक्तिगत प्रवास
  • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम आणि बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, कार्यक्रमाचे हॉल आणि तत्सम ठिकाणे.
  • शाळा, कॉलेज आणि कोचिंग इन्स्टिट्यूट
  • सर्व धार्मिक स्थळे आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
  • सर्व सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम