लॉकडाउन करावाच लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा !

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच असल्याने लॉकडाउनचे संकेत दिले जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील लॉकडाउन संदर्भात मोठे विधान केले आहे. राज्यात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही मात्र काही ठिकाणी लॉकडाउन लावावाच लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. काही ठिकाणी जास्त रुग्णसंख्या आढळून येत असल्याने काही ठिकाणी लॉकडाउन लावावाच लागेल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. जे.जे.रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतली.