जळगाव: कोरोना व्हायरसला रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आलेले आहे. जमावबंदीत रात्रिची वेळ निश्चित करून दिली आहे. तसेच किराणा दुकान व मेडिकल वगळता अन्य आस्थापने बंद आहेत. असे असताना रविवारी रात्री दहा वाजता काही हॉटेल सुरू असल्याचा प्रकार जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या पाहणीतून उघडकीस आला अाहे. या प्रकरणी नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात येवुन एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे.
अजिंठा चौफुली जवळील हॉटल मुरली मनोहर, नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटल, कालिका माता चौकातील श्री गुरू रामदाणी फेमिली रेस्टॉरंट इत्यादी त्यांच्या पाहणीत सुरू असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक डॉ उगले यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करून कारवाईचे आदेश दिले.
या पोलीस पथकाची कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक दीपक चौधरी, पोलीस कान्स्टेबल इम्रान सय्यद, पोलीस कान्स्टेबल हेमंत पाटिल यांचे पथक घटनास्थळी गेले असता सदर हॉटेल सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात केली.
या हॉटेल व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल
हॉटल मुरली मनोहर चे व्यवस्थापक लक्ष्मीनारायण चिरंजीवलाल उपाध्याय रा गणपतीनगर, हॉटल कारागीर सुभाष पंडितराव महाजन, दयाकिसन पुरुषोत्तम भाट, मोहन भगवान सोनवणे, सोनुकुमार दिपासींग , प्रेम वल्लभ जोशी सर्व रा.मुरली मनोहर हॉटल , हॉटल नारखेडे चा व्यवसथापक निलेश प्रकाश भावसार रा कासमवाडी, सुनील भागवत मराठे तसेच श्री गुरू रामदाणी फेमिली रेस्टॉरंट व्यवस्थापक जसप्रीतसिंग कवलसिग सहानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत.