लॉजमधून वीज उपकरण चोरणार्‍यांना अटक

0

पाचोरा । येथील मनोरमा लॉजमध्ये पोलीसांनी शुक्रवारी 8 रोजी धाड टाकली असता वीज उपकरणे चोरणार्‍या चार जणांना मुद्देमालासह अटक केली. पोलीसांनी गुप्त माहिती मिळाल्याने अचानक मनोरमा लॉजवर धाड टाकली. जितेंद्र राजपूत, अनिलकुमार निषाद, अक्षयबरला निषाद, शशीकुमार समरजीत चौघे ही अलाहाबाद जिल्ह्यातील मेजा तालुक्यात असणार्‍या सिंहपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून पोलीसांनी 71 लहान मोठे वीज उपकरणे जप्त केले.

अंबूजा फॅक्टरीचे साहित्य
चौघांची विचारपूस केली असता संबंधीत उपकरणे अंबुजा फॅक्टरीमधून चोरल्याचे कबुल केले. याप्रकरणी योगेश काळे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी.रसेडे, पोलीस कॉन्स्टेंबल शशिकांत पाटील, पोलीस नाईक अरुण पाटील, राहूल पाटील, गोपाल भोई, बापू पाटील, नितीन पाटील, नरेंद्र नरवाडे, विकास पाटील यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस कॉस्टेंबल शशिकांत पाटील करीत आहे.