भुसावळ। शहरातील जामनेर रोडवरील एका लॉजमध्ये मलकापूर येथील प्रवाशाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार 17 रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मलकापूर तालुक्यातील निंबारी येथील शुभम रामदास नेमाडे (वय 25) इसमाने निंबारी हे शहरातील जामनेर रस्त्यावर असलेल्या एका लॉजमध्ये मुक्कामास होत़े त्यांनी 16 रोजी सायंकाळपासून ते 17 रोजी सकाळच्या 11 वाजेदरम्यान काहीतरी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केली़ हि घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यासंदर्भात लॉजचे व्यवस्थापक रायचंद पालोदे यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकातील अधिकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.