लॉरेल सोसायटीत सौरऊर्जा, खतनिर्मिती प्रकल्प सुरू

0
पिंपरी : वाकड परिसरात लॉरेल हाऊसिंग सोसायटीकडून सौरउर्जा प्रकल्प व खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, सोसायटीचे संचालक कवलजित कौर सेठी, सेक्रेटरी मनोज कुमार सिन्हा, कमिटी सभासद असिफ जैन, विशाल लाड, अमित मित्तल, प्रतीक ठक्कर व सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
वाकडच्या लॉरेल सोसायटीत सौरऊर्जा व खतनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. लॉरेल सोसायटीमधील सर्व सभासदांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पूर्ण झाला. या सौरउर्जा प्रकल्पामुळे सोसायटीची 75 टक्के वीज बचत झाली आहे. तसेच खतनिर्मिती प्रकल्पही सोसायटीत राबविला असून 100 टक्के कचर्‍याची विल्हेवाट स्वतः लावत आहेत. या प्रकल्पाबद्दल सर्व सभासदांचे स्थायी सभापती ममता गायकवाड यांनी अभिनंदन केले.
अन्य सोसायट्यांनीही पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत
यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड म्हणाल्या की, वाकड परिसरात सर्व सोसायटीमध्ये हे प्रकल्प राबविण्याकरिता आम्ही स्वतः जाऊन जनजागृती करत आहोत. लॉरेल सोसायटीने हे प्रकल्प राबवून सर्व सोसायटी धारकांसाठी एक मॉडेल तयार केलेले आहे. या लॉरेल सोसायटीचा वाकड परिसरातील व आजूबाजच्या सोसायटीमधील नागरिकांनी आदर्श घ्यावा, इतरांनीही पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत. तसेच शहरातील सर्व सोसायटी धारकांनी असे प्रकल्प आपापल्या सोसायटीमध्ये राबविल्यास निश्‍चित कचरा विलगीकरणासह विजेची बचत होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे त्या सोसायटींना कर सवलतीचा लाभ घ्यावाअसेही आवाहन त्यांनी केले.