लोंजेत जुगारावर धाड ; नऊ जणांना अटक

0

चाळीसगाव- तालुक्यातील लोंंजे येथे जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली असता पोलीसांचे पथक तयार करून त्यांनी जुगारअड्यावर छापा टाकुन नऊ जणांवर कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील लोंंजे येथे पिरबाबा दर्ग्यामागे जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी तेथे जाऊन जुगार खेळत असताना विनोद वसंत गरूड, हेमा काळु राठोड, वल्मिक सुरेश अहीर, विठ्ठल दौलत सोनवणे, रमेश दौलत चव्हाण, प्रेमराज विश्राम राठोड, मुलचंद मांगु राठोड, लक्ष्मण सोमा राठोड, गोकुळ उत्तम राठोड (सर्व रा. लोंजे) यांना जुगार खेळताना यांच्याकडुन 9 हजार 890 रूपये रोख व जुगाराचे साधन जप्त करण्यात आले आहेत. पोना महेंद्र साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई जुगार अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर करीत आहेत.