लोंजे आंबेहोळ परीसरात रानडुकरांचा हैदोस

0

*लाखो रुपयांचे शेतपिकांचे नुकसान
चाळीसगाव – तालुक्यातील लोंजे आंबेहोळ परीसरात रानडुकरांनी उभ्या शेतपिकाचे नुकसान केले असुन अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे नुकसान केले आहे तर एकनाथ राठोड यांच्या शेतातील जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

तालुक्यातील लोंजे परीसर हा डोंगर व जंगल भागाजवळ असल्याने त्या परीसरात उभे असलेले पिके जंगलातील रानडुकरे ऊध्वस्त करतात विशेष करुन मका पिकांचे नुकसान रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर केले आहे. फक्त मक्याची कणसे खावुन इतर पिकांचे नुकसान करुन पिके ऊध्वस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. लोंजे येथील शेतकरी एकनाथ गोपा राठोड (वय-६०) यांची लोंजे व आंबेहोळ शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातील मका पिकाचे रानडुकरांनी जवळपास दोन लाखाचे नुकसान केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, तसा ऑनलाईन अर्ज त्यांनी वनविभाग प्रादेशिक यांना दिल्यानंतर मागील आठवड्यात वनविभागाचे घोडेगाव वनपाल पी बी देवरे, प्रकाश पाटील यांनी त्याठिकाणी जावुन पाहणी करुन पंचनामा केला असुन एका शेतपिकाचा १२ हजार तर दुसऱ्या शेतपिकाचा १७५०० रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले असेल, अशा शेतकऱ्यांनी वनविभागाकडे ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन वनविभाग प्रादेशिक चाळीसगाव यांनी केले आहे.