अमळनेर : लोंढवे येथील पाटील माध्यमिक विद्यालय येथे भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकासो चेअरमन श्रीराम पाटील, अतिथी म्हणून जि.प.सदस्या सोनू पवार, लोंढवे सरपंच सुमनबाई पाटील, जिजाबराव पाटील, विजय बहिरम, कैलास पाटील, उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून स्नेहसंमेलनात सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. विविध खेळात प्राविण्य मिळविलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करण्यात आले.
यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
सालाबादाप्रमाणे वैविध्यपूर्ण स्नेहसंमेलनाचे नियोजन केले होते. त्यात डान्स, गृप डान्स, शेतकर्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी नाटीका बेटी बचाव, बेटी पढाओ, शेतकरी आत्महत्या, सर्जिकल स्ट्राईक, ही संकल्पना साकारण्यात आली. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचलन मिलिंद पाटील, दीपक पवार मनोज पाटील यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी मानले.