लोंढवे येथे आयोजित खो-खो, कबड्डी स्पर्धेत रंगत

0

अमळनेर। तालुक्यातील लोंढवे येथे ’खेलो भारत खेलो’ अंतर्गत कबड्डी व खो-खोच्या खुल्या स्पर्धां झाल्या. कबड्डीच्या अंतिम सामन्यात सह्याद्री स्पोर्ट्स लोंढवे विजयी झाले व नगांव वॅरिअर्स हा संघ उपवीजयी व प्रताप कुमार व्यायाम शाळा संघ हा तृतीय संघ ठरला. खो-खोच्या अंतिम सामन्यात जी.एस.प्रबोधिनी विजयी व कै.आण्णासो हिराजी पाटील माध्य. आश्रम शाळा उपवीजयी व आदर्श क्रीडा मंडळ लोंढवे तृतीय वीजयी संघ ठरला.

कार्यक्रम यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
खेलो भारत खेलो क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार स्मिता उदय वाघ, स्व. आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन डॉ.बि.एस.पाटील,व पंचायत समिती सदस्य विनोद पाटील, नगांवचे सरपंच महेश पाटील, राजू पवार, दीपक पाटील, यांच्याहस्ते पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार डॉ.बि.एस.पाटील, आमदार स्मिताताई वाघ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पंच म्हणून महेश माळी, के.एस.पवार, एम.पी.पाटील, सचिन वाघ, मनोहर पाटील यांनी कामगिरी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब पाटील यांनी केले तर आभार वाल्मिक पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विनोद पाटील, मच्छिन्द्र पाटील, रावसाहेब पाटील, सतिश पाटील, श्रीकांत पाटील, छत्रपती पवार, अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, कैलास खैरनार तसेच शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.