अमळनेर । तालुक्यातील लोंढवे येथे खेलो भारत खेलो अंतर्गत कबड्डी व खो खोच्या खुल्या स्पर्धांना शुक्रवार 4 ऑगष्ट रोजी सुरवात करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव व अमळनेर भारतीय जनता पार्टी अमळनेर तसेच स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धांचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, पं.स.सभापती वजाबाई भिल यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावना मिलिंद पाटील यांनी केली पाहुण्यांचे स्वागत भाजपा तालुकाध्यक्ष, मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी केले.
याप्रसंगी खेळाडुना उदय वाघ यांनी प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले. या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो चे 24 संघ सहभागी झाले. पंच म्हणून मिलिंद पाटील, महेश माळी,डी.टी.खैरनार, सचिन वाघ, के.एस.पवार, यांनी कामगिरी केली. या कार्यक्रमास भाजयुमोचे तालुकाध्यक्ष भिकेश पाटील, शहराध्यक्ष राकेश पाटील, पं.स.सदस्या रेखाबाई पाटील, कृउबा संचालक पावभा पाटील, संचालक प्रफु्ल पवार, माजी जि.प.सदस्य व्ही.आर.पाटील, राजू पवार, भाजयुमो शहरध्यक्ष राकेश पाटील, नाटेश्वर पाटील, शितल देशमुख, श्रीराम पाटील, जिजाबराव पाटील, समाधान पाटील, कैलास पाटील, जाकीर शेख, उमेश वाल्हे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी केले तर आभार मिलिंद पाटील यांनी मानले. या स्पर्धांसाठी विनोद पाटील, मच्छिन्द्र पाटील, रावसाहेब पाटील, सतिश पाटील, श्रीकांत पाटील, छत्रपती पवार, अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, कैलास खैरनार, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.