लोंढवे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

0

अमळनेर । आतापर्यंत 3 कोटी सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गॅस आज वितरीत करता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. हे कृतीतून दाखवून दिले, असे प्रतिपादन खासदार ए.टी.पाटील यांनी या योजनेचा वितरण करतांना केले. शनिवारी सकाळी 11 वाजता तालुक्यातील लोंढवे येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत वंचितांना गॅस वितरण कार्यक्रमाच खासदार ए.टी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रारंभी लोंढवे अंगणवाडी शुभारंभ, दलित योजनेंतर्गत प्रवेशद्वार, गाव दरवाजा, दलित वस्ती योजनांतर्गत महिला 16 सीटचे उत्कृष्ठ मॉडेल शौचालय युनिट, खासदार निधीतून काँक्रीटच्या रस्त्याचा शुभारंभ, आमदार स्मिता वाघ यांच्या निधीतून इंदिरा नगर ते गांव रस्त्याचे भूमिपूजन, तसेच ग्रा.पं.मध्ये 14 वित्त आयोगाच्या निधीतून भुयारी गटारीचे भूमिपूजन, असे विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

63 गरजुंना गॅस किटचे वितरण
एकट्या लोंढवे गावात 63 वंचित कुटुंबाना या योजनेतून गॅसचे वितरण यावेळी करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक भारत पेट्रोलियमचे विपणन अधिकारी निलेश लथ्ये यांनी गॅस बाबत माहिती दिली. त्यात 5 करोड लोकांपर्यंत हे वितरण होणार आहे. महिला सशक्तीकरण या माध्यमातून हे वितरण बीपीएल घटकातील वंचित महिलांना होणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार हा लाभ वितरीत केला जात आहे. यासोबत माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, आमदार स्मिता वाघ, श्याम अहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले. प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील यांनी केले.

एक हजार 48 बीपीएल कुटूंबांना कनेक्शन
या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना खासदार ए.टी.पाटील म्हणाले मोदी सरकारने सर्व सामान्य गोरगरिबापर्यंत योजना घेऊन जाणारे सरकार आहे. कि 70 वर्षात एकही नेत्याने महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. मात्र नरेंद्रभाई मोदींनी घेतली. त्या योजनेत गॅस कनेक्शनसह अपघात झाल्यास 6 लाखांचा विमा व अपघातात घर नुकसान झाल्यास 2 लाखांचा विमा देण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यात एक हजार 48 बीपीएल कुटुंबाना हे कनेक्शन दिले जात आहे. अशा प्रकारे 70 योजना या सरकारने नव्याने सुरु केल्या आहेत. चुलीच्या धुराच्या माध्यमातून महिलांचे डोळे आणि फफ्फुसचे नुकसान करते. त्यासाठी आरोग्य चांगले राहावे इंधन वाचावे यासाठी ही योजना आहे. गॅस साहित्य सरकारने मोफत उपलब्ध करून दिले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, शाम अहिरे, जि.प. सदस्या सोनू पवार, पं.स.सदस्या रेखाबाई पाटील, अ‍ॅड व्ही.आर.पाटील, संदीप पाटील, डॉ.दीपक पाटील, भरतसिंग पाटील, प्रफुल्ल पवार, प्रल्हाद पाटील,भारत गॅसचे सेल्स ऑफिसर निलेश लथ्ये, अमळनेर येथील भारत गॅसचे वितरक चंद्रकांत देसले, जिजाबराव पाटील, सरपंच सुमनबाई पाटील, माजी सरपंच सिंधुबाई पाटील, प्रा.भागवत पाटील, कैलास पाटील, सुचिता बहिरम, आनंदा भिवसन पाटील, शितल देशमुख, नाटेश्‍वर पाटील, ग्रामसेवक मनिषा भोई, जाकीर शेख मुजावर, मच्छिन्द्र पाटील, कैलास खैरनार, रावसाहेब पाटील, लोंढवे पंच क्रोशीतील ग्रामस्थांसह असंख्य भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.