लोंबकळलेल्या वीज तारांसह जीर्ण खांब बदला : सेनेचे अधिकार्‍यांना साकडे

0

कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना निवेदन : दखल न घेतल्यास आंदोलन

भुसावळ- शहरातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत भागातील बाजार वॉर्ड, मोठी मजीद ते चोप्रा स्पोर्ट्स, ढाके गल्ली, चिरा गल्ली, महाजन वाडा, विठ्ठल मंदिर परीसरातील नागरीकांना वाकलेले वीज खांब आणि वीज तारामुळे वारंवार बंद होणार्‍या पथदिव्यांचा गेल्या तीस वर्षांपासून त्रास सहन होत आहे तर काही भागात जुने वीज खांब अद्यापही बदलले गेलेले नसून काही ठिकाणी वीज खांबांचे अंतर जास्त असल्याने वीज तारा लोंबकळत असून धोकादायक बनल्या आहेत. या संदर्भात दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी कार्यकारी रमण दातूनवाले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आह.

उत्सवाआधीच दखल घ्यावी
काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून त्याआधीच मुख्य व अंतर्गत मार्गावरील वीज खांब, तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्या शिवाय शहरातील गल्लीत लोंबकळणार्‍या वीज वाहिन्यांमुळे येथील नागरीकांचा जीव टांगणीला असून अप्रिय घटनेनंतर जाग येणार का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला. अप्रिय घटना घडल्यास वीज कंपनीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करू, असा इशारा शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी दिली. वीज वाहिन्यांसोबतच रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांच्या फांद्याही तोडाव्यात तसेच झाडांच्या फांद्या गणेशमूर्तीना लागू नयेत आणि अनर्थ ओढवू नये यासाठी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी कार्यकारी अभियंत्यांना सूचना केली. सर्व भागांचे शहर प्रमुखांना घेऊन सर्वेक्षण पुढील आठवड्यात करू तसेच अडचणीच्या ठिकाणाच्या आम्ही या वीज वाहिन्या लवकरच काढू, असे आश्वासन कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांनी दिले.

तर आंदोलन छेडण्याचा इशारा
लोंबकळलेल्या वीज तारा सरळ कराव्यात, पथदिवे कार्यान्वित करावे, जुने वीज खांब बदलून द्यावे तसेच केलेल्या कामांचा लेखी अहवाल सादर करावा अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, भुसावळ शिवसेना शहर प्रमुख (दक्षिण विभाग) बबलू बर्‍हाटे, शहर प्रमुख (उत्तर विभाग) निलेश महाजन, शहर संघटक जगदीश खेराडे, योगेश बागुल, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शिक्षकसेना उपजिल्हा प्रमुख पठाण आमिर खान, शिक्षकसेना तालुका प्रमुख अतुल शेटे, भा.वी. सेना शहर प्रमुख हेमंत बर्‍हाटे, ग्राहक संरक्षक कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शहरप्रमुख मनोज पवार, युवासेना पदाधिकारी सूरज पाटील, उपशहर प्रमुख राकेश खरारे, उपशहर प्रमुख पवन नाले, सोपान भोई, माजी शहर प्रमुख नामदेव बर्‍हाटे, दत्तात्रय नेमाडे, राकेश चौधरी, चंद्रकांत ठाकूर, विजय ठाकूर, युवराज वामने, संदीप चौधरी, शरद जोहरे, किशोर शिंदे, अन्सार शाह, अमोल पाटील, विक्की चौहान, पिंटू भोई आदींनी दिला आहे.