दि युनायटेड ख्रिश्चन युथ असोसिएशनतर्फे पोवाडा कार्यक्रम
भोसरी : येथील दि युनायटेड ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्तांच्या जीवनावर आधारित पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, शाहीर आमोस तिवडे, प्रेरणा दळवी, विश्वास दळवी, शलमोन काळे, शिरीष हिवाळे, राजेंद्र जाधव, अविनाश चक्रनारायण, रवींद्र गडगे, वसंत गजभिव, जॉन गजभिव, राजन नायर, प्रकाश दळवी, फ्रान्सिस जॉर्ज, एबनेझर डेव्हिड, मॅन्युएल डिसोजा, पूर्णा स्वेन, सुनील असोदे, विजय बनकर, अविनाश होळकर, यशवंत आवळे, व्ही. एस. गुडे, प्रेमानंद फे्रझर, आर. पी. इंगळे, बापू खंडिझोड, संतोष साळवे, योहान काळे, के. एम. पवार, पंकज लालझरे, सतीश कांबळे, येसूदास सायना, प्रेम उईके, नितीन काळे, राज नाडार, राज भंडारी, अनिश विजागत उपस्थित होते.
संयोजनात यांचा हातभार
पारंपरीक लोककलेतून शाहीर आमोस तिवडे यांनी अतिशय सुंदररित्या ख्रिस्तांचा जीवनप्रवास मांडला. संगीत विशारद प्रेरणा दळवी, विश्वास दळवी यांनी अनेक गीते सादर केली. शलमोन काळे यांनी दानार्पणचे विशेष गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी थॉमस डाबरे, सॅम्युएल साखरपेकर, एम. बी. मनोज, डॉ. एम. एन. तुलसी, मोझेस वाघमारे, निशिकांत काळे, सॉलोमन गायकवाड, बैजू साळवे, डेव्हिड काळे, फ्रासिन्स गजभिव, डॅनिएल सोनेकर, सॅम्युएल काळे, संदेश चोपडे, ब्रिटन नाडार, लाझारस सूर्यवंशी दीपक शर्मा, बन्यामीन काळे, भगवान डोंगरे, सोनू यांनी परिश्रम घेतले.