लोककल्याणकारी प्रकल्पांना विरोध करू नका : शिवतारे

0

पुरंदर । सद्यपरिस्थितीत विरोधक विकासकामांना खीळ घालत आहेत. त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येऊन नागरिकांचे नुकसान होते. प्रतिगामी प्रवृत्तींनी लोककल्याणकारी प्रकल्पांना विरोध करु नये, असे आवाहन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील लक्ष्मीआई सभामंडप मोडकळीस आला होता. स्थानिक रहिवासी व ग्रामपंचायतीच्या मागणीवरून या कामाकरीता आमदार फंडातून 12 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सदर सभामंडपाचे भूमीपूजन शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

विकासासाठी योजनांची अंमलबजावणी
लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प राबविले जातात. त्याद्वारे समाजाची प्रगती होते. यापूर्वी किरकोळ अपवाद वगळता चांगल्या प्रकल्पांना विरोध होत नव्हता, असे शिवतारे यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब घाटे, रमेश इंगळे, उमेश गायकवाड, सरपंच लताताई भिसे, भाऊसाहेब कटके, शंकर घाटे, मोहिनी लोणकर, अविनाश निगडे, संदीप कटके आदींसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमाचे नियोजन शिवाजी पवार, केरबा शेलार, सोपान भिसे, अनिल गायकवाड, संतोष भिसे, श्रीधर गायकवाड, माऊली शेलार, चंद्रकांत शेलार, शेखर शेलार, प्रशांत शेलार, दिलीप गायकवाड आदींसह पंचशील तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी दादासाहेब घाटे, पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सुनील लोणकर व भिवरी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी भाऊसाहेब दळवी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्तविक नाथाभाऊ कटके यांनी केले. सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. नवनाथ भिसे यांनी आभार मानले.