हडपसर । भरमसाठ वाढलेले शैक्षणिक शुल्क पाहता सर्वसामान्य पालकांनाही आपल्या पाल्याचे शिक्षण पूर्ण करणे जिकरीचे झाले आहे. अशा वेळेस आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असणार्यांना लोककल्याण प्रतिष्ठानने सुरू केलेली लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना ही संजीवनी ठरत आहे, असे मत उद्योजक संजय निकम यांनी व्यक्त केले.
तुकाई दर्शन फुरसुंगी येथील लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी मानसी गोरीवले (दहावी 82 टक्के)या विद्यार्थीनीस एक सायकल, 15,800 रुपये शैक्षणिक शुल्काचा धनादेश, दोन गणवेश, शैक्षणिक साहित्य व पुस्तके तसेच मृणाली कुराडे हिला 12,300 रुपये शैक्षणिक शुल्काचा धनादेश, गणवेश, शैक्षणिक साहित्य वह्या व पुस्तके याचे वाटप निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजाभाऊ होले, गायकवाड, प्रा. एस. टी. पवार, अरुण शिंदे, परशुराम शिंदे, अनिता निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जगताप, प्रास्ताविक दिलीप भामे, आभार रेवणसिद्ध कलशेट्टी यांनी मानले. विनोद सातव, चंद्रकांत सोनवणे, प्रवीण होले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.