हे देखील वाचा
नंदुरबार: नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून जिल्ह्यात रोजगाराचे साधन हे मोलमजुरी आहे १५ दिवस संपूर्ण लोकडाऊन केल्यास सामान्य माणसाचे रोजगाराविना उपासमार होणार आहे. मोठे व्यापारी, लहान व्यावसायिक तसेच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचा पोटापाण्याचा विचार करून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने लोकडाऊन काळात सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहू द्यावी अश्या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीचा वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना डॉ नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र मराठे, मुकेश माळी, क्षितिज लवांदे यांनी दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाचा आदेशानुसार दि. १ ते १५ एप्रिल पर्यंत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात लोकडाऊन जाहीर केले आहे. याकाळात फक्त अत्यावश्यक सेवा ( किराणा, भाजीपाला ) यांनाच सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास सूट दिली आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने सर्वांचा उदरनिर्वाह हा रोजंदारी काम करून होत असतो, तसेच छोटे छोटे दुकान (स्टोल) हातमजुरी, हातलॉरीवर लहान दुकान, केशकर्तनालय, नाश्त्याची दुकाने यावर रोजगार चालतो. त्याचप्रमाणे मोलमजुरी करणारे ( गवंडीकाम, सुतारीकाम,पेंटिंगकाम आणि अन्य ) यावर कामाला जाणाऱ्यांचे रोज कमवतात व रोज खातात अशी स्थिती आहे. मोठे व्यापारी जे आहेत त्यांचाकडे जे कामगार आहेत ते त्यांना प्रतिष्ठाने सुरू असली तरच पगार देतात अशी सर्व स्थिती असतांना प्रशासनाचा पूर्ण लोकडाऊन आदेशामुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आपल्या शेजारच्या धुळे जिल्ह्यात ही जिल्हा प्रशासनाने लोकडाऊन घोषित केले आहे परंतु दिवसभर व्यापारी प्रतिष्ठाने सुरू राहणार असून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लोकडाऊन असणार आहे. संघटनेला ज्ञात आहे की, नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण निघत आहे त्या समस्येबरोबरच नागरिकांचा रोजगाराच्या/ उदरनिर्वाहचाही मोठा प्रश्न आज जिल्ह्यात आहे. तरी जिल्ह्या प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सरसकट सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी ( यात गवंडीकाम, सुतारीकाम, पेंटिंगकाम हे सामाजिक अंतर ठेवून असते म्हणून त्यांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूट द्यावी ) व दुपारी २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लोकडाऊन करावे असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर डॉ नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत