फैजपुर : शहराच्या नगराध्यक्षा अमिता चौधरी यांनी भाजपा लोकनियुक्त नगराअध्यक्षा महांनदा रविंद्र होले यांच्याकडे सोमवार 26 रोजी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, जिल्हा उपाध्यक्ष हिरा चौधरी, तालुकाध्यक्ष नरेंद्र कोल्हे, विलास चौधरी, माजी नगराध्यक्ष पी.के चौधरी, जिल्हा दूध सघांचे सचांलक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, भाजपा गटनेते व जेष्ठ नगरसेवक बापु वाघुळदे, भाजपा शहराध्यक्ष संजय रल यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरचिटणीस संजय सराफ, आनंदा नेहेते, रविंद्र होले, नितिन नेमाडे, सुनिल दुसाने, दिपक होले, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस निलेश पाटील, युवा अध्यक्ष भुषण चौधरी, सोशल मिडिया अध्यक्ष विनोद कोल्हे, मोहन होले, जितेंद्र वाघुळदे, सुरज गाजरे यांसह नगरसेवक, कर्मचारी, पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.