23 सप्टेंबर रोजी होणार मतदान ; 24 सप्टेंबर रोजी मतमोजणी
तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. ह्या निवडणूकीचे महत्व म्हणजे शासनाचा अध्यादेश जारी झाल्यानंतर जनतेतुन निवडला जाणारा पहिला सरपंच ह्या जिल्ह्यात बहुमान मिळविणारा सरपंच ठरणार आहे. तर राजकीय दृष्ट्या तालुक्यात सर्वात जास्त महत्वपूर्ण निवडणूक असुन विविध राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 4 सप्टेंबर पासुन उमेदवारी दाखल करता येणार आहे. तर 8 सप्टेंबर पर्यंत मुदत राहील. 13 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघार 23 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 24 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उशीरापर्यंत बैठका सुरु आहेत. प्रत्येक राजकीय कार्यकर्ता चांगल्या उमेदवाराचा शोध घेत आहेत. ह्या निवडणूकीकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागणार आहे.
सरपंचपद हे आदिवासी जमातीसाठी राखीव असल्याने उपसरपंच पदाचा उमेदवार महत्वपूर्ण ठरणार आहे. एकूण 17 जागासाठी मतदान होईल त्यात 9 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 50% जागा ह्या निवडणूक आयोगाचा निर्देशना प्रमाणे राखीव आहेत. आतापर्यंत सर्वात या ग्रामपंचायततीवर स्व. पीके अण्णा पाटील गटाचे राजकीय वर्चस्व राहीले आहे. आता सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील हे नेते आहेत. तर जिप माजी कृषी सभापती भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली होती. गेल्या 20 वर्षांपूर्वी स्वतः भगवान पाटील यानी सरपंचपद भूषविले आहे. आता सद्या ग्रामपंचायतीवर त्यांच्या गटाचे वर्चस्व असुन त्याचे लहान बंधु प्रकाश पाटील हे उपसरपंच आहेत.
यावेळी जनतेतुन सरपंच निवडले जाणार असल्याने निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. जिल्ह्याचे सारेच राजकीय पक्षाचे नेते दाखल होण्याची शक्याता आहे. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांचे कॉग्रेस पुरस्कृत पॅनल राहील त्यांचे उमेदवार माजी उपसरपंच अनिल अशोक पाटील राहतील असा अंदाज आहे. निवडणूकीचा आधारावर दिपक पाटील यांचा नेतृत्त्वाची प्रतिष्ठपणाला लागणार आहे. तर दुसरे पॅनल माजी कृषी सभापती भगवान पाटील यांचे रहाणार आहे. त्यांची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक भागातुन उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. या व्यतीरिक्त सध्या मतदार संघात खासदार व आमदार भाजपाचे असल्याने भाजपाचे पॅनल उभे करावेच लागणार आहे. या निवडणूकीत विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांची राजकीय वर्चस्वाची परीक्षा दिसणार आहे. चौथे पॅनल राष्ट्रवादी काँग्रेसचे राहील असा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. म्हसावद ग्रामपंचायत निवडणूकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा नावांवर निवडणूक लढवता. स्वतंत्र आघाडी राहील राजकारणापासून लांब राहुन गावाचा विकासासाठी राजकारण न करता सर्वांचे सहकार्य घेतले जाईल. ग्रामस्थ हा महत्वाच्या घटक आहे. जनतेतुन सरपंच निवडण्याचा शासनाचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया डॉ.भगवान पाटील यांनी दिली.