लोकन्यायालयात 10 दावे निकाली

0

फैजपूर : महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, यावल तालुका न्यायालय व उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या अंतर्गत फिरते लोकन्यायालयात एकूण 50 दिवाणी व फौजदारी दावे दाखल झाली. यातील 10 दावे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात यावल सहदिवाणी न्या. व्ही.पी. धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. एस.जी. कवडीवाले, नितीन चौधरी, देवेंद्र बाविस्कर, अशोक सुरळकर, अ‍ॅड. लोंढे, निवृत्ती पाटील, गौरव पाटील, सरकारी वकील अ‍ॅड. सुरडकर, खालिद शेख, एस.आर. तडवी, पोलीस कॉन्स्टेबल असलम खान यांनी कामकाजात सहकार्य केले.