शहादा। येथील लोकन्यायालयात 279 पैकी 55 खटले आपसात मिटवुन त्यात 86 लाख 71 हजार सहाशे ब्याऐशी तर दाखलपुर्व 851प्रकरणापैकी 42 प्रकरणे आपसात तळजोळीने मिटवुन त्यात 21 लाख 05 हजार एकोंनव्वद रुपये असे एकुण 1130 प्रकरणापैकी 102 प्रकरणात 1कोटी 77लाख 67 हजार सहाशे एक्काहत्तर रुपये वसुल करण्यात आले.विधी सेवा समिती, शहादा यांच्या वतीने राष्ट्रीय लोकन्याय आयोजीत करण्यात आले होते. यावेळी बोलताना न्या.पी.बी.नाईकवाड यांनी सांगितले की,सामोपचाराने मिळविलेले वादाचे परिणाम समाधानकारक असुन त्यामुळे इतर लोकांमध्ये चांगला संदेश जातो.आपसातील वाद मिटविण्यासाठी शासनस्तरावर नवनविन योजना राबवल्या जात आहेत.
लोकांचा वेळ व पैशांची बचत
आपसातील वाद मिटविण्याचे लोकन्यायालय हे उत्तम माध्यम असुन त्यामुळे लोकांचा वेळ व पैशांची बचत होते.या लोकन्यायालयमध्ये जास्तीत-जास्त खटले आपसात मिटवुन वेळेची व पैशांची बचत करा असे आहवान येथील जिल्हा व सत्र न्या.पी.बी.नाईकवाड राष्ट्रीय न्यायालयाचे वेळी केले.यावेळी तीन पॅनेल बनविण्यात आले होते.पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.बी.नाईकवाड,दिवाळी न्यायाधिश( वस्तर )डब्ल्यू.जे. दैठंनकर,सहदिवाणी न्यायाधिश एम.बी.सोनटक्के तर पॅनेल सदस्य म्हणून अॅड.ए.डी.गुलाले,अॅड.जे.पी.कुवर,अॅड.सी.डी.भंडारी,डी.आर.एम.सोनवणे,अॅड.बी.बी.वळवी,अॅड.व्ही.सी.पथारिया उपस्थित होते.लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे अधिक्षक आर.बी.पावरा,पंचायत समिती लिपीक जे.बी.आहिरे व सर्व न्यायालयीन कर्मचार्यानी परिश्रम घेतले.