बोराडी । गावातील भांडण-तंटा गावाता मिटायला पाहिजे जेणे करुन लोकांचा वेळ व आर्थिक नुकान होणार नाही. अनेक वाद गेल्या काही वषर्त्तपासून सुरु असतील पण त्या दोन्हींमध्ये टाळ-मेळ बसत नसतील तर अशी भांडणे-तंटे मिटविण्यासाठी लोकन्यायालय सुरु करुन वाद मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा वापर केल्यास परस्परातील संवाद कायम राहिल असे शिरपूर न्यायालयाच्या विधीसेवा समितीचे न्या.बी.सी.मोरे यांनी बोराडी येथे केले. महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई, शिरपूर तालुका वकील संघ, बोराडी ग्रामपंचायत यांच्या संयूक्त विद्यमाने बोराडी परिसरासाठी फिरते न्यायालयाच्या कामकाजाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी 8 फौजदारी खटल्यांचा निपटारा केला.
ताण कमी होईल
या प्रसंगी भाजपस तालुकाध्यक्ष रंधे यांनी बोराडीसह परिसरातील लोकांना दिवसेदिवस वाढत्या केसेसमुळे न्यायालयातील खटले प्रलंबीत आहेत. यामुळे न्याय मिळण्यास विलंब होतो. फिरत्या लोक न्यायालयात माध्यमातून येथे लोकांना न्याय मिळू शकेल. पैसा, वेळ वाया न जाता न्याय संस्थेवर वाढणारा ताण कमी होईल. म्हणून फिरत्या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिरते लोक न्यायाालयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटविकास अिाकारी भरत कोसोदे, भाजपा तााुकाध्यक्ष राहूल रंधे, अॅड.शांताराम महाजन, अॅड.युवराज ठोंबरे, अॅड.किशोर सोनवणे, अॅड.उदय गुाराथी, अॅड प्रदिप राजपूत, सांगवी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक खेळकर, नथू बडगुजर, विजय देवरे, शांमकांत पाटील, अशोक महाान, शंशाक रंधे, विजय गोपाळ, संजय नगराळे, प्रेमसिंग गिरासे, योगेश मोरे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.