लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी आजपासून अण्णा हजारेंचे उपोषण !

0

मुंबई : लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथील आपल्या गावी आजपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने काल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री हे पद लोकायुक्तांच्या कक्षेत आले आहे. याविषयी अण्णा हजारे यांनी ‘मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे अभिनंदन करत आहे. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नाही.’ असे सांगितले आहे.